जुन्या वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य? लवकरच निर्णय

फास्टॅगच्या माध्यमातून डिजिटल आणि आयटी आधारित शुल्क भरणा करायला प्रोत्साहन

स्ते परिवहन आणि  महामार्ग मंत्रालयाने 1 डिसेंबर  2017 पूर्वी विक्री केलेल्या जुन्या वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याबाबत हितधारकांकडून मते आणि  सूचना मागविण्यासाठी 1 सप्टेंबर 2020 रोजी जीएसआर 541 (ई) मसुदा अधिसूचना अधिसूचित केली आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 मधील सुधारित तरतूद 1 जानेवारी 2021 पासून अंमलात आणण्याचे प्रस्तावित आहे.

तसेच, फॉर्म 51 (विमा प्रमाणपत्र) मध्ये दुरुस्तीद्वारे नवीन थर्ड पार्टी विमा घेताना वैध फास्टॅग  अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये फास्टॅग आयडीचा तपशील निवडता येईल. हे  1 एप्रिल 2021 पासून अंमलात आणण्याचे प्रस्तावित आहे.

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम,1989 नुसार नवीन चार चाकी वाहनांच्या नोंदणीसाठी 2017  पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते आणि वाहन उत्पादक  किंवा त्यांच्या डीलर्सनी ते पुरवायचे होते.  फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण केवळ परिवहन वाहनांसाठी फास्टॅग  फिटमेंटनंतरच केले जाईल, असा आदेश देण्यात आला आहे. तसेच  राष्ट्रीय परमिट वाहनांसाठी, फास्टॅग  फिटमेंट 1 ऑक्टोबर 2019 पासून बंधनकारक आहे.