कृषी पंढरी’ संकेतस्थळावरील माहिती वाचण्यासाठी, वापरण्यासाठी नियम आणि अटी.
ज्या अर्थी आपण वाचक, वापरकर्ता (यूजर) म्हणून कृषी पंढरी या संकेतस्थळावर, वेबसाईटवर, पोर्टलवर आला आहात, त्या अर्थी आपल्याला या संकेतस्थळाशी संबंधित असलेल्या या नियम आणि अटींची माहिती आहे आणि आपल्याला त्या मान्य आहेत असे सुरवातीलाच गृहित धरण्यात आले आहे.
या पुढे वाचताना ‘कृषी पंढरी’संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकाचा/ वापरकर्त्याचा/नागरिकाचा उल्लेख वाचक असा केला जाईल. या अटी व शर्ती कृषी पंढरीवरील सर्व प्रकारच्या व स्वरूपाच्या आशयाल, जसे की लिखित/ टेक्स/ सोशल मीडिया/आॅडिओ/व्हिडिओ/ चित्र/ग्राफिक/ छायाचित्रं/ व्हर्ज्युअर रिअॅलिटी/आॅगमेंटेड रिअॅलिटी यांना लागू राहतील याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.
या अटी आणि नियमांत वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार कृषी पंढरीने राखून ठेवलेले आहेत.
1. ‘कृषी पंढरी’ या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश शेती, हवामान, ग्रामविकास, कृषी उद्योग, कृषी बाजारभाव, यासह मुलाखती, यशकथा, ज्ञान मनोरंजन अशी माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे असा आहे. संबंधित माहिती ही कृषी पंढरीचे बातमीदार, प्रतिनिधी, संपादक, संपादकीय कर्मचारी, संचालक यांनी किंवा यांच्याशी संबंधित व्यक्ती/प्रतिनिधींनी स्वत: संकलित केलेली असू शकेल किंवा विविध संकेतस्थळे, सरकारी वेबसाईट आणि अन्य माहिती स्त्रोतांमधून निवडलेली असू शकेल. माहिती संदर्भातील दावे, शिफारशी, कृती, इत्यादी बाबी वाचकाने स्वत: तपासून पाहाव्यात किंवा अनुभवी तज्ज्ञांच्या, कृषी तज्ज्ञांच्या माहितीशी किंवा प्रत्यक्ष पडताळून पाहाव्यात आणि मगच त्या माहितीच्या वापराचा, उपयोगाचा, विनियोगचा विचार करण्याचा निर्णय घ्यावा. त्या संबंधी झालेल्या दुष्परिणाम, नुकसान, आर्थिक नुकसान अथवा अन्य नुकसानीस कृषी पंढरी वेबसाईट, तिचे संपादक मंडळ, संचालक मंडळ आणि संबंधित कर्मचारी व प्रतिनिधी कुणीही जबाबदार राहणार नाही.
2. हवामान : कृषी पंढरीमध्ये वर्तविण्यास आलेल्या हवामानविषयक अंदाज किंवा त्या संदर्भातील बातम्या, माहिती ही भारतीय हवामान विभागासह विविध हवामान विषयक माहिती देणाºया, सेवा पुरविणाºया संस्थांच्या हवाल्याने, तसेच या संदर्भातील लेख किंवा लेखन हे संबंधित अनुभवी, तज्ज्ञ लेखकांकडील माहिती व ज्ञानाच्या आधारे प्रसिद्ध केले जातात. या संदर्भातील अंदाज चुकणे, दावे खोटे ठरणे याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित स्त्रोतांच्या, विभागाच्या माहितीची असणार आहे. त्यासाठी कृषी पंढरी संकेतस्थळ जबाबदार नसेल.
3. पीक लागवड आणि कृषी सल्ला : कृषी पंढरीमध्ये प्रसिद्ध होणाºया विविध पीकांच्या लागवड, व्यवस्थापन, मशागत, कीटकनाशक इत्यादी सल्ला आणि माहिती, तसेच शेती लागवडीची कृती ही विविध कृषीविद्यापीठांतील, राज्य शासनाच्या/केंद्र शासनाच्या कृषी विभागातील, कृषी विज्ञान व संशोधन संस्था, तसेच काही कृषी संस्था, कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग कंपन्या, कृषी सेवा केंद्र, कृषी सल्ला-सेवा केंद्र यांसह विविध कृषी संबंधित संस्था- आस्थापनांमधील कृषी तज्ज्ञ, पशुपालन तज्ज्ञ, पशुवैदयकीय अधिकारी, पशुवैदयक, शेतीचे शास्त्रज्ञ, अनुभवी कृषी कर्मचारी, कृषी विस्तार अधिकारी, कृषी प्राध्यापक-अध्यापक, शासकीय-अर्धशासकीय कृषी अधिकारी- कर्मचारी, अनुभवी शेतकरी, कृषी सल्लागार, कृषी संशोधक, कंपन्यांमधील कृषी संशोधक-शास्त्रज्ञ-कृषी विस्तार अधिकारी-कृषी विपणन अधिकारी यांनी दिलेल्या, लिहिलेल्या माहितीच्या किंवा स्त्रोतांच्या, अंदाजांच्या, अनुभवाच्या हवाल्याने प्रसिद्ध केली जाते. यातील माहितीचा पीकांवर, शेतीवर, जनावरांवर किंव त्या संबंधी वापर करताना त्यातील तथ्यता स्थानिक तज्ज्ञांकडून समजावून घेणे तसेच त्यासाठी आपला अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग या आधारे आपल्या सद्सद् विवेकबुध्दीचा वापर करून अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी अंतिमत: ही संबंधित वाचक/शेतकरी वाचकाची असेल.
संबंधित कृषीसल्ला, कृषी माहितीत सांगितलेल्या किटकनाशक, रसायने, खते, औषधे, बियाणे, यंत्रसामग्री, कृषी पद्धती यांचा वापर, अवलंब, प्रचार प्रसार करण्यापूर्वी आपल्या गावाकडील स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाऊसमान, हवामान, पाण्याची उपलब्धता, पिकांचा वा जनावरांचा, पक्ष्यांचा प्रकार, मातीचा पोत यां बद्दल शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून कृषी तज्ज्ञ, कृषी संशोधक, कृषी अधिकारी, कृषी प्राध्यापक यांच्या प्रत्यक्ष हवाल्याने, खात्री करून मगच आपल्या सदसदविवेक बुद्धीच्या आधार स्वत:च्या जबाबदारीवर करावयाचा आहे. यासंदर्भात शेतातील पीक किंवा काढलेले उत्पादन, माती-जमिन, पाणी, पशुपक्षी, यांसह मानवी हानी, जीवित अथवा मालमत्तेची हानी, शारिरिक अथवा मानसिक, आर्थिक नुकसान, पर्यावरणीय नुकसान, जीवशास्त्रीय नुकसान, हवामानशास्त्रीय नुकसान वा अन्य नैसर्गिक, मानवनिर्मित साधन संपत्तीचे नुकसान झाल्यास त्याची जबादारी कृषी पंढरी संकेतस्थळ, वेबसाईट, त्यांचे संचालक, मालक, संपादक, संपादकीय विभाग, कर्मचारी वा प्रतिनिधी यांची नसून संबंधित वाचक अथवा वाचक शेतकºयांचीच असणार आहे.
4. सेंद्रिय रासायनिक खत, कीटकनाशके, पशुखाद्याच्या मात्रा कृषीतज्ज्ञ/ पशुतज्ज्ञ यांनी प्रमाणित केलेल्या असतात. त्यांचा काटेकोर वापर करावा, त्यासाठी कृषी पंढरीतील लेखांतील/बातमीतील माहिती वाचून प्रत्यक्ष तिचा अवलंब करण्यापूर्वी स्थानिक हवामान,भौगोलिक स्थिती आणि पीकाच्या , जनावराच्या प्रकारानुसार निर्णय घ्यावा. त्यासंबंधी झालेल्या नुकसानीस कृषी पंढरी जबाबदार असणार नाही.
5. बाजारभाव/बाजारमाहिती : कृषी पंढरीमध्ये अनेकदा स्थानिक/ राज्य/देश-विदेशातील बाजारभाव-कृषी बाजारभाव-पशु बाजारभाव-खाद्यान्न बाजारभाव, तसेच यासंदर्भातील मार्केट, बाजाराच्या माहितीची/ विश्लेषणाची, निर्यात संबंधी माहिती प्रसिद्ध होत असते.त्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजारसमिती, पणन मंडळ अथवा शासकीय अथवा खासगी कृषी बाजार तज्ज्ञ अथवा विश्लेषकाची मदत घेतली जाते, तसेच संबंधित संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीचा वापर केला जातो. वाचकांनी/ शेतकºयांनी आपल्या शेतमालाची विक्री करताना तसेच बाजारपेठ, बाजारसमिती, मार्केट याबदद्दलचे निर्णय घेताना, आर्थिक देवाणघेवाण करताना संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अथवा खात्री करून मगच व्यवहार करावा. त्यासंदर्भातील नंतर होणाºया आर्थिक व वा अन्य कुठल्याही प्रकारच्या नुकसानीची जबाबदारी ही संबंधित वाचकांची/ शेतकºयांची आहे. त्यासाठी कृषी पंढरी संकेतस्थळ वा व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
6. मुलाखत/यशकथा: कृषी पंढरीवर प्रसिद्ध होणाºया मुलाखती, यशकथा, आत्मचरित्र, चरित्र,डॉक्युमेंटेशन, तात्कालिक माहिती, औपचारिक, अनौपचारीक माहिती यात सांगितलेले शेती व्यवस्थापन-पशु व्यवस्थापन, प्रक्रिया, धंदे-जोडधंदे, बाजारभाव, यंत्र-तंत्र याबद्दलचे दावे, माहिती, कृती, इत्यादी त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असते. संबंधित ठिकाणची माती, भौगोलिक स्थिती, हवामान, कृषी निविष्ठा, बाजार, मार्केट स्थिती, व्यक्तीगत ज्ञान, मेहनत, समज अशा व्यक्तिगत अनुभवाशी संबंधित असलेल्या यशकथा, मुलाखती यातील दावे, तथ्य यांचा वापर, अनुसरण, अनुपालन, प्रचार प्रसार करताना त्यातील दावे, माहिती तथ्ये यांची योग्य व्यक्तीकडून/तज्ज्ञ/अनुभवी अधिकृत तज्ज्ञाकडून तपासणी, खात्री करूनच करावे. अन्यथा या माहितीच्या वापरातून-प्रचार-प्रसारातून होणारे वैयक्तिक, पीकाचे, जनावरांचे, पर्यावरण, मालमत्ता, माती, पाणी, नैसर्गिक स्त्रोत, आर्थिक, मानसिक, सामजिक, राष्टÑीय असे कोणत्याही स्वरूपाच्या नुकसानीस ‘कृषी पंढरी’ संकेतस्थळ, कृषी पंढरीचे मालक, संचालक, संपादक, प्रतिनिधी, कर्मचारी असणार नाहीत. अंतिमत: अशा सर्व माहितीच्या वापरातून उदभवणाºया चांगल्या वाईट परिणामांची, घटना-घटनाक्रमांची, जबाबदारी ही संबंधित वाचक/ शेतकरी वाचकांवर असणार आहे.
7. बाह्य-दुवे आणि समाजमाध्यम : ‘कृषी पंढरी’ संकेतस्थळावरील/वेबसाईटवरील माहितीत अनेकदा संदर्भासाठी बाह्य संकेतस्थळ, पोर्टल/वेबसाईट यांचे दुवे/लिंक/हायपरलिंक/ एम्बेड कोड /एचटीएमएल कोड/ किंवा अन्य शेअरिंग कोड यांचा वापर केलेला असतो. मात्र त्या दुव्यातील/लिंकवरील मजकूर/छायाचित्रे/आॅडिओ/व्हिडिओ/फॉर्म इत्यादी माहितीची व माहितीच्या तथ्यांची जबाबदारी ‘कृषी पंढरी’ संकेतस्थळ आणि त्याच्याशी संबंधित मालक, संचालक, संपादक, कर्मचारी, प्रतिनिधी यांची असणार नाही. कृषी पंढरी- अशा बाह्यदुव्यांच्या माहितीची पडताळणी करत नाही, त्यामुळे अशा माहितीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपयोग, विनियोग, वापर, अवलंब, अनुसरण, प्रचार-प्रसार करण्यापूर्वी वाचकांनी संबंधित संकेतस्थळावरील नियम आणि अटींचा, प्रायव्हसी पॉलिसीचा अवलंब करून त्यानुसार आपल्या सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. अंतिमत: या लिंकच्या वापरातून होणाºया कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही स्वरूपाच्या (आर्थिक/सामाजिक/मानसिक/ सायबर क्राईम/ डाटा-विदागार चोरी-गैरवापर-चाईल्ड पोर्नोग्राफी-आॅनलाईन बुलिंग-सायबर बुलिंगसह सर्व प्रकारचे सायबर क्राईम) चांगल्या आणि वाईट परिणामांची अंतिम जबाबदारी ही संबंधित वाचकांची/ शेतकरी वाचकांची असणार आहे. अशा बाह्य दुव्यांशी संबंधित संकेतस्थळांवर कृषी पंढरीच्या वाचकाने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही स्वरूपाच्या व्यवहारांना आणि त्याच्या परिणामांना-दुष्परिणामांना कृषी पंढरी जबाबदार असणार नाही.
वाचकांच्या माहितीसाठी, तसेच त्यांच्यापर्यंत सुलभतेने माहितीचे दळणवळण होण्यासाठी कृषी पंढरी विविध समाजमाध्यमांचा वापर करत असते. त्यासाठी समाजमाध्यमांतील आपल्या अधिकृत खात्यांचा वापर/अवलंब कृषी पंढरीकडून केला जातो. मात्र या माहितीच्या वापराचे निकष हे संबंधित समाजमाध्यमातील/संकेतस्थळातील नियम अटी/प्रायव्हसी पॉलिसी यांच्याशी संबंधित असेल.
8. कॉपीराईट आणि माहितीचा गैरवापर: कृषी पंढरीवरील माहिती व आशयाचे हक्क राखून ठेवलेले आहेत. त्यातील माहितीचा कुठल्याही स्वरूपात वापर, गैरवापर करता येणार नाही.
9. कृषी पंढरीवरील माहितीचा आशयाचा अर्थ वाचकाला व्यवस्थित समजला आहे, हे गृहित धरण्यात आलेले आहे. मात्र संबंधित माहिती, तथ्ये यांचा चुकीचा-गैर अर्थ काढून अनवधानाने, हेतुपुरस्सर वैयक्तिक, सामाजिक, राष्टÑीय नुकसान केल्यास, पोहोचविल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित वाचकाची असेल. कृषी पंढरी संकेतस्थळ त्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.
10. वाचकांच्या प्रतिक्रिया : संकेतस्थळावरील प्रत्येक मजकूराखाली वाचकांच्या प्रतिक्रिया देण्याची सुविधा आहे. या प्रतिक्रियांमध्ये / कॉमेंटमध्ये नोंदविलेली मते ही संबंधित वाचकाची वैयक्तिक मते असतील, त्याच्याशी कृषी पंढरी संकेतस्थळ सहमत असेलच असे नाही. अशा प्रतिक्रियांशी संपर्क, वादविवाद, संवाद करताना वाचकाने आपल्या जबाबदारीवर आणि सदसदविवेक बुद्धीने करावा. त्यासंदर्भातील वाद-विवाद, दावे -प्रतिदावे, यांसह वैयक्तिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक अशा कुठल्याही प्रकारच्या संबंधित वाचकाच्या नुकसानीस कृषी पंढरी जबाबदार राहणार नाही.
11. ब्लॉग/ कॉलम/ लेख : कृषी पंढरीवर प्रसिद्ध होणाºया लेखकांच्या ब्लॉग, कॉलम, लेख वा इतर मल्टिमीडिया स्वरूपातील आशयाशी कृषी पंढरी संकेतस्थळ तसेच कृषी पंढरी संकेतस्थळाचे मालक, संचालक, संपादक, कर्मचारी, प्रतिनिधी सहमत असतीलच असे नाही.
12. जाहिरात आणि निवेदने आणि अॅडव्होटोरिअल्स : ‘कृषी पंढरी’ संकेतस्थळावरील जाहिराती/ निवेदने/ अॅडव्होटोरिअल्स हे संबंधित जाहिरातदार, जाहिरात संस्था यांनी दिलेल्या मजकुराप्रमाणे प्रसिद्ध केल्या जातात. त्यातील माहितीची, दाव्यांची, व्यवहारांची कृषी पंढरी खातरजमा करेलच असे नाही. त्यामुळे वाचकांनी/शेतकºयांनी जाहिरातींतील दावे, आशय, मजकूर, माहिती, व्यवहार यांची शहानिशा करून/ पडताळून पाहूनच पुढील व्यवहार करण्याचा निर्णय स्व: जबाबदारीवर घ्यावा.
या शिवाय जाहिरातीची भाषा, ग्राफिक, चित्र, छायाचित्र, मजकूर, आशय, (त्यावर असलेल्या लिंक्स, आॅडिओ, व्हिडीओ, कॉटॅँक फॉर्म इत्यादी माहिती ही सुद्धा संबंधित जाहिरातदार, जाहिरात संस्था, अॅडव्होटोरिअल देणारी, निवेदन देणारी व्यक्ती/संस्था यांनी दिल्याप्रमाणे प्रसिद्ध केले जातात. त्याच्याशी कृषी पंढरी संकेतस्थळ, त्याचे मालक, संचालक, संपादक, कर्मचारी, प्रतिनिधी सहमत असतीलच असे नाही. त्यामुळे अशा जाहिरातींची व्यक्तिगत शहानिशा करूनच वाचकांनी त्यांच्याशी व्यवहार करावा. त्यातून होणाºया संभाव्य फायदा तोटा, दुष्परिणाम, आर्थिक नुकसान, मालमत्तेचे नुकसान, सामजिक वा राष्टÑीय नुकसान यांची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित वाचकाची/ शेतकरी वाचकांची असेल, त्याच्याशी ‘कृषी पंढरी’शी संबंध असणार नाही.
गुगल किंवा जाहिरात संकेतस्थळांकडून बाह्य दुव्यांदवारे मिळणाºया जाहिराती : गुगल, गुगल अॅडसेन्स किंवा अन्य बाह्य जाहिरात संकेतस्थळांवरील ‘कृषी पंढरी’ वर प्रसिद्ध होणाºया जाहिराती या वाचकाच्या ब्राऊजरच्या माहितीच्या आधारे संबंधित लिंकवरून प्रसिद्ध केल्या जातात. उदा. वाचकाने आपल्या मोबाईल/संगणकाच्या इंटरनेट ब्राऊझरवर जर शेतीची माहिती सर्च केली असेल किंवा बघितली असेल, तर त्यांना शेतीशी संबंधित जाहिराती ‘कृषी पंढरी’च्या माध्यमातून दिसतील. तथापि अशा या जाहिरातीच्या मजकूराची वा प्रकाराची कुठलीही जबादारी ‘कृषी पंढरी’ घेत नाही. त्यांच्याशी वाचकांनी कोणत्याही स्वरूपात व्यवहार करताना योग्य ती खात्री/पडताळणी/शहानिशा करूनच करावा. त्यासाठी वाचकाच्या होणाºया कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही स्वरूपाच्या नुकसानीस ‘कृषी पंढरी’ संकेतस्थळ, त्यांचे मालक, संचालक, संपादक, कर्मचारी, प्रतिनिधी, भागीदार, सहयोगी, तांत्रिक सहयोगी जबाबदार असणार नाहीत.
13. औरंगाबाद न्यायकक्षेच्या अधीन.