पब्जीसह ११८ चीनी अ‍ॅप्सवर बंदी

भारत आणि चीन सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने चीनी कंपन्यांच्या ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पबजी गेम अ‍ॅप्सचाही यात समावेश आहे.  माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली होती. त्यानंतर 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पुन्हा एकदा चीनच्या 118 अॅप बंदी घातली आहे.

भारताने बंदी घातलेल्या या ऍपमध्ये लीवीक, पबजी मोबाईल लाईट, वूई चॅट वर्क, कॅमेरा सेल्फी संर्दभातील विविध ऍप, म्युझिक प्लेअर एमपी 3, वेब ब्राऊझर, फोटो गँलरी आणि ऍप लॉक यासारख्या ऍपचा समावेश आहे. देतील नागरिकांच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा लक्षात घेऊन, ऍपवर बंदी घातली आहे.

गेल्या 29 जून रोजी सरकारने टिकटॉक, यूसी ब्राऊजर, कॅम स्कॅनर अशा ५९ चिनी अ‌ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारे हे अ‌ॅप्स असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.