कोविड-19 विषयी वारंवार विचारल्या जाणा-या प्रश्नांना एम्सच्या ‘ई-आययूयू’च्यावतीने दिलेली उत्तरे –
1. आपण आरोग्य सेवा कर्मचारी (एचसीडब्ल्यू) असताना रोग प्रतिबंधक म्हणून एचसीक्यूचा उपयोग केला पाहिजे का?
– एचसीक्यू महणजेच हायड्रोक्लोरोक्विनच्या वापराचा सल्ला आरोग्य सेवा कर्मचा-यांना रोग प्रतिबंधक म्हणून दिला जातो, मात्र कर्मचारी म्हणजे उच्च जोखीम असलेले मानले जातात त्यामुळे कोविड-19 पासून संरक्षण करण्यासाठी पीपीई संच आणि इतर संक्रमण नियंत्रणाच्या पद्धतींचा योग्य वापर करण्याची अतिशय आवश्यकता आहे.
2. कोविड रुग्णांसाठी ‘आयव्हरमेक्टिन वापरता येवू शकते का?
– ‘आयव्हरमेक्टिन विट्रोमधील सार्स-सीओव्ही2 मध्ये प्रतिकृतीचा एक शक्तिशाली प्रतिबंधक असल्याचे दिसून आले आहे. परंतु कोविडमध्ये हा परिणाम मिळविण्यासाठी आवश्यक डोस नेहमीच्या डोसापेक्षा जास्त आहे. सध्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांमध्ये याची शिफारस करण्यात आलेली नाही. परंतु ज्या कोविड रूग्णांना प्रतिबंधक उपचार म्हणून एचसीक्यू दिले आहे, त्यांना हे वापरता येऊ शकते.
3. रुग्णालयातून घरी आल्यानंतरही रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे औषध आपण सुरू ठेवले पाहिजे का?
– आमच्या अनुभवानुसार कोविडनंतर रक्त साकाळणे, गोठणे यामध्ये अतिशय गुंतागुंत निर्माण होते, उपचाराच्या काळामध्ये औषधांमुळे दाहकता वाढलेली असते. एकदा का रूग्णावरचे उपचार संपले आणि तो घरी परतला की, रक्त गोठण्याचा धोका खूपच कमी झालेला असतो. त्यामुळे आम्ही रक्त गोठण्याची क्रिया थांबवणा-या औषधांचे सेवन करण्याचा सल्ला सर्वसाधारण कोविड रूग्णाला देत नाही. मात्र जर इतर काही कारणांमुळे रूग्णाला ती औषधे लागणार असतील तरच सूचविली जातात.
4. कोविड-19 मध्ये अचानक होणारे मृत्यू
– रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये किंवा रुग्णालयामध्ये कोविड -19 च्या रुग्णांचा अचानक मृत्यू हृदयक्रिया बंद पडून किंवा लक्षात न आलेल्या कारणांमुळे त्याचबरोबर फुफ्फुसामध्ये गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे कोविड वेगाने विकसित होतो आणि रूग्ण गंभीर होतो. यामध्ये फुफ्फुसामध्ये काही जुनाट रोग असेल तर रूग्ण गंभीर होण्याची जोखीम जास्त असते. त्यामुळे रूग्णांचे काटेकोर परीक्षण करणे गरजेचे असते. अशा गंभीर रुग्णांनी आरोग्य सेवकाच्या मदतीने हालचाल करावी, एकट्याने हालचाल करण्याची परवानगी देण्यात येवू नये. अशा जोखमीच्या रूग्णांसाठी रक्त गोठू नये म्हणून औषधांचा वापर केला जावा. रक्तस्त्राव होण्याचा धोका टाळण्यात यावा.
5. मिथाइल प्रेडनिसोलोन विरुद्ध डेक्सामेथासोन
– सध्या मध्यम ते गंभीर कोविड-19 च्या रुग्णांना कॉर्टिकोस्टेरॉईडस् दिले जाते. बरे होण्याच्या चाचणीमध्ये डेक्सामेथासोनचा वापर केला जात आहे. तथापि चार डेक्सामेथासोन किंवा मिथाइल प्रेडनिसोलोन यांचा उपलब्धतेनुसार वापर केला जावू शकतो.
6. टॉसिलायझुम्बची भूमिका काय आहे?
– डीसीजीआयने सध्याच्या साथीचा प्रसार लक्षात घेवून अनुकंपा तत्वावर टॉसिलायझुम्बला मान्यता दिली आहे. तथापि, ही एक प्रायोगिक चिकित्सा आहे. त्याची भूमिकाही मर्यादित आहे आणि केवळ सक्रिय संक्रमण काढून टाकल्यानंतर सायटोकाईन सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्येच याचा वापर करण्यात आला पाहिजे.
7. प्लाझ्मा उपचार पद्धतीची भूमिका काय आहे?
– एबीओ जुळत असलेल्या रक्तदात्यांकडून जमा करण्यात आलेल्या काॅन्व्हेलेसेंट प्लाझ्मा, हा रोगाच्या प्रारंभीच्या अवस्थेमध्ये गंभीर कोविड होण्याचा धोका असलेल्या रुग्णांना दिला जावू शकतो. तथापि, ही एक प्रायोगिक चिकित्सा मानली पाहिजे आणि त्याचा वापर पूर्ण दक्षतेने केला पाहिजे.
8. फेविपिराविरची भूमिका
– कोविडच्या सौम्य आणि लक्षणे न दिसणा-या रुग्णाची रोगप्रतिकारक म्हणून फेविपिरावीरचा प्रामुख्याने वापर केला जात आहे. अभ्यासानुसार कोविडचा शरीरामध्ये पसरणे रोखण्यासाठी याचा वापर केला जात आहे. असे रुग्ण मदतनीसांनी काळजी घेतली आणि आरोग्य कर्मचा-यांनी केलेल्या देखरेखीमुळे बरे होतात. तसेच त्यांना सामान्यपणे कोणत्याही चिकित्सेची गरज नसते. फेविपिरावीरच्या वापराविषयी फारसे पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे सध्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांमध्ये याची शिफारस केलेली नाही.
9. फुफ्फुसांच्या फायब्रोसिसच्या प्रतिबंधामध्ये प्रतिजैविकांची भूमिका
– कोविडशी संबंधित फायब्रोसिस रोखण्यासाठी पिरफेनिडोनसारख्या अँटिफायब्रोटिक घटकांच्या वापराचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नाही. त्यामुळेच त्यांचा वापर करण्यात येवू नये.
10. कोविड-19 च्या रूग्णांमध्ये येणारे औदासिन्य कसे टाळता येईल?
– कोविड-19 च्या रुग्णांमध्ये येणारे नैराश्य सामान्यपणे आढळतेच. याला अनेक कारणे असू शकतात. रूग्णाला एकांतवासामध्ये रहावे लागते, आपल्याला झालेल्या रोगाविषयी मनामध्ये असलेली चिंता, काळजी, त्याचबरोबर हा आजार झाला म्हणजे सामाजिक कलंक लागला असल्याचे, विचार त्या रुग्णाच्या मनात येतात. अशा रुग्णांना मानसशास्त्रज्ञ अथवा मानसोपचारतज्ज्ञांकडून तसेच प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचारींकडून सहानुभूती दाखवणे आणि मनोवैज्ञानिक समुपदेशन करणे आवश्यक असते.
11. ज्यांची कोविड चाचणी नकारात्मक आली आहे, अशा तरीही उच्च संशयित, संदिग्ध रुग्णांना आपण रेमडेसिवीर किंवा टीसीझेड देवू शकतो का?
– रेमडेसिवीर किंवा टीसीझेड या प्रायोगिक चिकित्सा आहेत. सध्याचा महामारीचा काळ लक्षात घेवून डीसीजीआयने त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे केवळ संदिग्ध रूग्ण असताना त्यांना अनुभवजन्य चिकित्सा म्हणून वापरू नये. ज्यांना कोविड झालेला आहे, त्यांनाच देण्यात यावे, असे वैद्यकीयदृष्ट्या सूचित करण्यात आले आहे.
12. आपण मेथिलीन ब्लू वापरू शकतो का?
– नाही. कोविड-19 च्या वैद्यकीय व्यवस्थापनामध्ये मेथिलीन ब्लूची कोणतीही भूमिका नाही.
13. आपण रेमडेसिवीर किती काळ देवू शकतो?
– रेमडेसिवीरचा दररोज एक डोस असा पाच दिवस डोस देण्याची शिफारस सध्या केली जाते.
14. अल्पवयीन रोगाची लक्षणे न दिसणा-या संदिग्ध रुग्णांसाठी रेमडेसिवीर- टीसीझेडचा वापर करू शकतो का?
– अशा रूग्णांसाठी रेमडेसिवीर-टीसीझेडचा वापर केल्याचा कोणताही पुरावा नाही.
15. कोविड-19 रुग्णाला तो दाखल असलेल्या रूग्णालयाच्या प्रभागामध्ये जावून नातेवाइकांना भेटता येते का?
– नाही. कोविड रुग्णाला कोणाही नातेवाइकांना भेटण्याची परवानगी नाही. कारण त्या भेटणा-या नातेवाइकाला संसर्ग होण्याची आणि तो पसरण्याची शक्यता असते.
16. कोविडचा रुग्ण लहान बालक असेल तर त्याच्याबरोबर पालकांना राहण्याची परवानगी दिली जाते का?
– जोखमीचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आणि तशी परवानगी मिळाली तरच पालक कोविड झालेल्या मुलाबरोबर रूग्णालयात राहू शकतात.
17. रूग्णालयातून घरी आल्यानंतर स्टेरॉइडस सुरू ठेवावेत?
– नाही. रूग्णालयातून घरी आल्यानंतर स्टेरॉइडस सुरू ठेवण्याची गरज नाही. जर इतर कोणत्याही रोगाचे संकेत नसतील तर सुरू ठेवू नयेत.
18. व्हँटिलेशनवर असलेल्या रूग्णाचे पोषण आपण कसे करावे?
– व्हँटिलेशनवर असलेल्या रूग्णाला अंतर्गत स्थितीनुसार टीपीएन किंवा राईलच्या नळीने पोषण दिले जावू शकते.
19. एनआयव्ही वरून व्हँटिलेशनवर रुग्णाला कधी न्यावे?
– जर रुग्ण सक्षम नसेल, श्वसनाला त्याला त्रास होत असेल आणि श्वास घेताना थकवा येत असेल किंवा जीआयएस एनआयव्ही सहन करण्यास असमर्थ असेल तर त्याला तातडीने व्हँटिलेशनवर ठेवण्याचा विचार केला पाहिजे.
20. आपण ट्रेकिओस्टॉमीचा विचार कधी केला पाहिजे?
– ज्या रुग्णांना दीर्घकाळपर्यंत व्हँटिलेशनवर ठेवावे लागणार आहे, अशी शक्यता निर्माण होते, अशा रुग्णांच्या बाबतीत ट्रेकिओस्टॉमीचा विचार केला पाहिजे.