भाजीपाला निर्यात एक सुवर्णसंधी

भाजीपाला उत्पादकांसाठी खरोखरच निर्यात हि एक सुवर्णसंधी आहे. मुळात आज भाजीपाला खात्रीशीर बाजारपेठेचा उरला नाही असे बोलले जाते. प्रतिकूल हवामानाचा सामना करताना लहरी बाजारपेठेचा सामना करणारे भाजीपाला हेही एक मुख्य शेतमाल आहे. यात बदल करायचा असेल तर भाजीपाला निर्यातीवर लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थिती राज्यातून मोठ्या प्रमाणात भेंडी, मिरची, शेवगा, फरसबी, कारले आणि दुधी भोपळा यांची निर्या

 आयात निर्यात परवाना:
भाजीपाला निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना आयात-निर्यात परवाना काढणे जरुरीचे आहे. हा परवाना काढण्यासाठी खालील बाबी आवश्यक आहेत.

 आवश्यक कागदपत्रे:
संस्था नोंदणी प्रमाणपत्र: साक्षांकित केलेली छायांकित प्रत, आयकर विभागाकडून प्राप्त होणारा कायम खाते क्रमांक, साक्षांकित केलेली छायांकित प्रत, प्रपत्र-बीनुसार बँकेच्या लेटरहेडवर प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, बँकेच्या प्रमाणपत्रावरील छायाचित्रावर बँक अधिकाऱ्याचे साक्षांकन आवश्यक, सहसंचालक विदेश व्यापार यांची नावे इंग्रजी अक्षरात लिहलेला एक हजार रुपयांचा पुणे किंवा मुंबई येथील राष्ट्रीयकृत बँकेत देय असलेला डिमांड ड्राफ्ट (डिमांड ड्राफ्टची चौकशी करून तो काढावा) प्रपत्रानुसार घोषणापत्रही आवश्यक. ए-४ आकारातील पाकीट व ३० रुपयांचे पोस्टल स्टँम्प, अर्जाबाबतची माहिती व प्रपत्र यांची नमुने http://dgft.delhi.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रपत्रातील माहिती भरून त्यावर स्वाक्षरी करून अर्जदाराने सहसंचालक विदेश व्यापार यांच्या पुणे किंवा मुंबई कार्यालयात स्वतःच्या हस्ते किंवा नोंदणीकृत टपालसेवेने सर्व कागदपत्रांसह अर्ज सदर करावा. आयात निर्यात परवाना प्राप्त झाल्यानंतर निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी तथा सहभागी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. यासाठी कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा, नवी दिल्ली यांच्या विभागीय कार्यालय अथवा अपेडाच्या संकेतस्थळावरही नोंदणी करता येते. मात्र, अपेडाच्या कार्यालयाकडे यासंबंधित सर्व कागदपत्रे व फी जमा करावी लागते.
 आवश्यक कागदपत्रे:
शेतीमाल किंवा अन्नाच्या सुरक्षिततेबाबत हमी देण्यासाठी खालील प्रमाणपत्रे आवश्यक असतात: ग्लोबल गॅप प्रमाणपत्र (global gap certificate), आरोग्यविषयक प्रमाणपत्र (health certificate), पॅकहाउस प्रमाणपत्र (pack house certificate), अॅगमार्क प्रमाणपत्र (agmark certificate), सॅनेटरी प्रमाणपत्र (phyto sanitary certificate).

 आयातदार कसा शोधावा?
विवध माध्यमांतून शेतकऱ्यांना आयातदार शोधता येतो. तसेच काही संकेतस्थळावरही (अपेडा) यांची माहिती उपलब्ध असते. आयातदरांची यादी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष आयातदरांशी संपर्क साधावा लागतो व निर्यातीसाठी उपलब्ध भाजीपाल्याची माहिती द्यावी लागते. आयातदाराची बाजारातील प्रत तपासणेही जरुरीचे असते. हि प्रत तपासणीचे काम एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉपोरिशन ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून केले जाते. निर्यातीसाठी सर्व कागदपत्रे तयार करणे, विमानात किंवा जहाजात जागा आरक्षित करणे, कस्टम क्लियरिंग करणे या सर्व कामासाठी सीएचए (कस्टम हाउस एजंट) ची नियक्ती करावी लागते. हे एजंट मुंबई व पुण्यात उपलब्ध असतात. याशिवाय महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून अशा सीएचएचे संपर्क उपलब्ध करून दिले जातात. विक्रीची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी परकीय चलन विनिमयाचे व्यवहार ज्या बँकेत केले जातात, अशा बँकेतच चालू खाते उघडणे जास्त सोयीस्कर ठरते.

 भाजीपाला निर्यातीपुर्वी:
भाजीपाला ज्या देशात निर्यात करावयाचा आहे, त्या देश नेमकी काय मागणी आहे, तेथे नेमकी कशी गुणवत्ता हवी आहे, प्रतवारी, पॅकिंग व दर याची माहिती तेथील आयातदारांकडून करुन घ्यावी. वरील बाबतीत सर्व खात्री झाल्यानंतर माल पाठवितानाही योग्य हाताळणी करून पॅकिंग तयार करावे. परदेशात विक्रीसाठी आकर्षक, ताजा, टिकाऊ व सुबक पॅकिंगमधील भाजीपाला व शेतमाल पाठविला पाहिजे. आपली हाताळणी जेवढी शात्रोक्त, तेवढा परदेशात आपला मालाला उठाव अधिक राहणार आहे, याची नोंद भाजीपाला उत्पादक निर्यातदराने घ्यावी. यातील महत्वाचा घटक पॅकिंग हाउस आहे. पॅकहाउस आहेत.

 निर्यातीसाठी आवश्यक सुविधा:
भाजपला हा नाशवंत माल असून त्याच्या निर्यातीसाठी शीतसाखळी ही शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. भाजीपाला पिकाच्या निर्यातक्षम दर्जाच्या उत्पादनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणेही आवश्यक आहे. याकरिता पॅकहाउस, कोल्ड स्टोअरेजेस या बाबी महत्वाच्या आहेत.

 निर्यातक्षम भाजीपाला उत्पादनासाठी:
बियाण्याची निवड करताना नामांकित कंपनीचे बियाणे वापरावे. ते बियाणे विषाणूजन्य रोगांना व रसशोषक किडींना प्रतिकारक असावे. खतांचा वापर करताना एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. संबधित आयातदार देशाने निश्चित केलेल्या ‘एमआरएल’ च्या उर्वरित अंशाचे (केमिकल रेसिड्यू) प्रमाण असणे आवश्यक आहे. पिक काढणी व अंतिम फवारणी यातील अंतर तपशील ठेवणे, अधिकृत विक्री केंद्र चालकांकडून रसायने व निविष्ठाची खरेदी करावी. कीड व रोगाचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

श्री. यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती