सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास

आयआरएसडीसीने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) च्या पुनर्विकासासाठी पात्रता विनंती अर्ज (आरएफक्यू) मागवले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) रेल्वे स्थानकाच्या पीपीपी मोडद्वारे  पुनर्विकासासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समिती (पीपीपीएसी) च्या तत्त्वत: मंजुरीनंतर , पीपीपीनुसार  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) च्या पुनर्विकासासाठी पात्रता विनंती अर्ज (आरएफक्यू)  आयआरएसडीसी द्वारे 20.08.2020 रोजी प्रकाशित एनआयटीद्वारे आमंत्रित केले आहेत.  आरएफक्यू दस्तावेज  http://irsdc.enLivea.com/  वर उपलब्ध आहेत.  बोली प्रक्रियेआधी होणारी परिषद  22.09.2020 रोजी होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22.10.2020 आहे.

पात्रता निकष पूर्ण करणार्‍या अर्जदारांना पुढील टप्प्यात सहभागी होता  येईल. बोलीची संपूर्ण प्रक्रिया ही दोन-टप्प्यात असून यामध्ये  पात्रता विनंती अर्ज (आरएफक्यू ) आणि प्रस्तावासाठी विनंती अर्ज  (आरएफपी) यांचा समावेश आहे.  आरएफपी टप्प्यावर  निवडलेला बोलीदार  रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि  आसपासच्या रेल्वे जमीनीच्या व्यावसायिक विकास भाडेतत्वावर  व्यावसायिक विकासासाठी 60 वर्षांपर्यंत आणि निवडलेल्या भूखंडांवर निवासी विकासासाठी 99 वर्षापर्यंत, परिचालन आणि  देखभालसह सवलतीच्या आधारावर 60 वर्षांसाठी हाती घेईल. स्थानकाच्या व्यावसायिक परिचालन तारखेनंतर वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे  सवलत घेणार्‍याचे कायमस्वरूपी उत्पन्न असेल.

हे नियोजन फ्रान्समधील मेसर्स एआरईपी यांनी केले आहे आणि वेळोवेळी  विविध हितधारकांशी चर्चाही  झाली आहे. स्थानकाचा  पुनर्विकास खर्चात (अनिवार्य खर्च)  1642 कोटी रुपये वित्तपुरवठा आणि आकस्मिकता खर्च समाविष्ट  आहे. पुनर्विकासासाठी गुंतवणूकीची संधी डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर) तत्वावर आहे.