74 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त फिल्म्स डिव्हिजनने अतिशय मेहनतीने भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्य चळवळीचे दुर्मिळ क्षण (फुटेज ) संकलित केले आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2020 रोजी ‘इंडिया विन्स फ्रीडम” (22min/B&W/Eng./1985) आणि ‘इंडिया इंडिपेंडंट’ (20 min/B&W/Eng./1949) असे दोन माहितीपट दाखवले जाणार आहेत.
‘इंडिया विन्स फ्रीडम ‘ हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मालिकेचा एक भाग आहे ज्यामध्ये नवे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचे आगमन आणि राजवटीकडून भारताच्या जनतेकडे सत्ता हस्तांतरित होण्यासंबंधी विविध घटनांचे चित्रण आहे.
‘इंडिया इंडिपेंडेंट’ या माहितीपटात स्वातंत्र्यासाठी भारताच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचे वर्णन आहे. सुमारे दोनशे वर्षांपासून भारतातील परदेशी राजवटीचा इतिहास पडद्यावर जिवंत करण्यात आला आहे. 1857 च्या विद्रोहाच्या काळापासून (स्वातंत्र्याचे पहिले युद्ध) महात्मा गांधींच्या हौतात्म्यापर्यंत भारतीय देशभक्तांची गाथा चित्ररूपात ध्वनिमुद्रित केली आहे.
या व्यतिरिक्त, 7- 21, ऑगस्ट 2020. दरम्यान सुरू असलेल्या ‘ऑनलाईन देशभक्तीपर चित्रपट महोत्सवात’ राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) पुढाकाराने स्वातंत्र्य चळवळीला आणि देशभक्तीपर भावनेला समर्पित फिल्मस् डिव्हिजनचे 14 निवडक चित्रपट दाखवले जात आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्वातंत्र्यदिन सोहळा 2020 चा भाग म्हणून हा महोत्सव ‘www.cinemasofindia.com‘ वर विनामूल्य दाखवला जात आहे.
देशभक्तीची भावना पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी कृपया फिल्म्स डिव्हिजनचे संकेतस्थळ https://filmsdivision.org/ वर भेट द्या आणि “डॉक्युमेंट्री ऑफ द वीक ” विभागावर क्लिक करा किंवा स्वातंत्र्यदिनी हे विशेष चित्रपट पाहण्यासाठी एफडी यूट्यूब चॅनेल, https://www.youtube.com/user/FilmsDivision किंवा ‘www.cinemasofindia.com‘ वर लॉग ऑन करा.