प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार (Marathwada Rain Forecast) मराठवाडयात दिनांक 17 व 18 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 जुलै रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 20 जुलै रोजी बीड, धाराशिव, लातूर व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर बीड, धाराशिव, नांदेड, लातूर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 17 व 18 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 जुलै रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 20 जुलै रोजी बीड, धाराशिव, लातूर व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 जूलै 2024 दरम्यान पाऊस, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.