भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 14,704 पर्यंत कमी झाली; 707 दिवसांनंतर 15 हजारांहून कमी
एका महत्त्वपूर्ण घडामोडीत सातत्यपूर्ण घसरणीचा कल कायम राखत भारताची सक्रिय रुग्णसंख्या आज 707 दिवसांनंतर 15,000 पेक्षा कमी (14,704) झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.03% आहे. 21 एप्रिल 2020 रोजी सक्रिय रुग्णसंख्या 14,759 होती.
घसरणीचा कल कायम राखत गेल्या 24 तासात 1,233 नवे रुग्ण आढळले.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,876 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,24,87,410 झाली आहे.
गेल्या 24 तासांत एकूण 6,24,022 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 78.85 (78,85,56,935) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.25% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.20% आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 183.82 कोटीपेक्षा अधिक (1,83,82,41,743) लसींच्या मात्रा देण्यात आल्या. 2,19,19,610 सत्रांतून हे साध्य झाले आहे.
12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 लसीकरण 16 मार्च, 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 1.50 कोटी (1,50,55,291) पेक्षा जास्त किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकडेवारीची वर्गनिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे.
Cumulative Vaccine Dose Coverage |
||
HCWs |
1st Dose |
10403582 |
2nd Dose |
9998306 |
|
Precaution Dose |
4445103 |
|
FLWs |
1st Dose |
18413039 |
2nd Dose |
17506270 |
|
Precaution Dose |
6838374 |
|
Age Group 12-14 years |
1st Dose |
15055291 |
Age Group 15-18 years |
1st Dose |
57027194 |
2nd Dose |
37729295 |
|
Age Group 18-44 years |
1st Dose |
554469705 |
2nd Dose |
464931719 |
|
Age Group 45-59 years |
1st Dose |
202722920 |
2nd Dose |
185097617 |
|
Over 60 years |
1st Dose |
126719220 |
2nd Dose |
115296186 |
|
Precaution Dose |
11587922 |
|
Precaution Dose |
2,28,71,399 |
|
Total |
1,83,82,41,743 |