दिलासादायक : कोरोना बाधित घटत आहेत; देशात 2,503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या (36,168) इतकी असून, गेल्या 675 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या

रोगमुक्ती दर सध्या 98.72% इतका

कोरोनामुक्तीवर वैशिष्ट्यपूर्णपणे विजय  मिळवत, भारतात गेल्या 24 तासांत 2,503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, गेल्या 680 दिवसांतील ही सर्वात कमी रूग्णसंख्या आहे

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 36,168 इतकी असून गेल्या 675 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.देशातील  कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.08% आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.72% वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 4,377 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, (देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,41,449 झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशात एकूण 5,32,232 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 90 लाखांहून अधिक (77,90,52,383) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात  दररोजच्या आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत असून सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.47% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.47%.इतका झाला आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 180 लाख 19 हजारांहून अधिक  (1,80,19,45,779) मात्रा देण्यात आल्यामुळे,, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 180 कोटी 13 लाखांचा (180,13,23,547) टप्पा ओलांडला आहे.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार देशभरात एकूण 2,10,99,040 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,647
2nd Dose 99,84,784
Precaution Dose 43,11,566
FLWs 1st Dose 1,84,11,505
2nd Dose 1,74,77,757
Precaution Dose 65,65,248
Age Group 15-18 years 1st Dose 5,58,92,605
2nd Dose 3,38,83,880
Age Group 18-44 years 1st Dose 55,33,47,902
2nd Dose 45,54,94,388
Age Group 45-59 years 1st Dose 20,25,37,734
2nd Dose 18,28,01,487
Over 60 years 1st Dose 12,65,93,557
2nd Dose 11,38,50,979
Precaution Dose 1,03,89,740
Precaution Dose 2,12,66,554
Total 1,80,19,45,779