देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.70%

गेल्या 24 तासांत देशात 4,184 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 18 लाख 23 हजारांहून अधिक  (18,23,329) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 179 कोटी 53 लाखांचा (1,79,53,95,649) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 2,09,22,227 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,375
2nd Dose 99,80,218
Precaution Dose 42,79,747
FLWs 1st Dose 1,84,11,037
2nd Dose 1,74,68,936
Precaution Dose 64,77,578
Age Group 15-18 years 1st Dose 5,56,54,876
2nd Dose 3,24,98,481
Age Group 18-44 years 1st Dose 55,29,72,639
2nd Dose 45,25,52,270
Age Group 45-59 years 1st Dose 20,24,67,568
2nd Dose 18,20,74,949
Over 60 years 1st Dose 12,65,52,468
2nd Dose 11,33,93,853
Precaution Dose 1,02,08,654
Precaution Dose 2,09,65,979
Total 1,79,53,95,649

 

गेल्या 24 तासांत 6,554 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,20,120 झाली आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.70% झाला आहे.

 

 

गेल्या 24 तासांत, देशात 4,184 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 44,488 इतकी आहे. देशात सध्या कोविड  असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.10% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 8,73,974 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 60 लाखांहून अधिक (77,60,82,445)  चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्यात आली असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.58% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.48%.इतका आहे.